Tuesday, May 7, 2013

आता नवीन लेख (post) मराठीतसुद्धा उपलब्ध !

मला सर्वांना हे सांगण्यास आनंद होत आहे कि, आता मी काही लेख मराठीतसुद्धा लिहणार आहे. मुळातच इंटरनेट आल्यापासून आपण इंग्रजीचाच जास्तीत जास्त वापर करीत आलेलो आहोत आणि त्यात काही चुकीचे आहे असे मलातरी वाटत नाही. पण इंग्रजीबरोबर आपल्याला मराठीचासुद्धा शक्य तेवढा वापर केला पाहिजे.

माझ्या आवडीप्रमाणे मी माझे सर्वसाधारण विचार, मते, आणि तंत्रज्ञानाविषयी माहिती लिहित असतो. असो, मला आशा आहे कि, तुम्हाला माझी हि नवीन कल्पना आवडली असेल.



मला याचीही कल्पना आहे कि, मराठीत लेख लिहिणे आणि तेसुद्धा कम्प्युटर किंवा तंत्रज्ञानाबद्दल, खूपच अवघड जाईल मला आणि याची कारण म्हणजे पर्यायी मराठी शब्दांची कमतरता. आज आपल्या  सर्वांनाच इंग्रजी शब्द खूपच अंगवळणी झालेले आहेत. त्यामुळे समजेल अशा शब्दातच सर्व लेख असतील याची काळजी मी पुरेपूर घेईन .



…. क्रमश…….

3 comments:

Please post your comments if you liked this post or you want send your feedback or a appreciation/motivation messsage